> जि. प. प्रा. शाळा हरिनगर (बें.) > ! >

स्वागत

जि. प.प्रा.शाळा हरिनगर बें. या शैक्षणिक BLOG वर आपले सहर्ष स्वागत आहे

Wednesday, November 16, 2022

बाल आनंद मेळावा @ दशसुत्री उपक्रम

 *नमस्कार शिक्षक बंधु भगिनी,या वर्षी आरणीय मु. कार्यकारी अधि. यांचे संकल्पनेतून दशसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी शाळा स्तरावर सुरु आहे. याबाबत कोणते उपक्रम राबवावे हा संभ्रम सर्वांकडे किंवा काही शिक्षक बांधवाकडे असण्याची शक्यता गृहित धरून एक आपण नेहमी राबवित असलेला उपक्रम यात कसा बसवावा याबद्दल एक संकल्पना डोक्यात आली , त्याबदल आपल्यापर्यंत माहिती पोहचवण्याचा छोटा प्रयत्न.*

( सदर संकल्पनेत आपण आपल्या कल्पना विचार वाढवू शकता किंवा खालील एखादा मुद्दा कमी करू शकता)


*बाल आनंद मेळावा ( आठवडी बाजार)= एक शैक्षणिक उपक्रम*


*उपक्रमाचे नाव: आनंदी बाजार( आठवडी बाजार)*


*उपक्रमांची संकल्पना: जि.प. सोलापूर ( मागील काही वर्षापासून)*


*या वर्षांची थिम:*

     सदर उपक्रम आपणास शाळा स्तरावर राबविणे नवे नाही परंतू यावर्षी सदर उपक्रम आपण 

दशसूत्री या नाविण्य पूर्ण उपक्रमात समाविष्ट कसा करावा याविषयी थोडेसे!


*उदिष्ट्ये:*

१ दशसुत्री उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी चा एक उपक्रम.

२. विद्यार्थ्यांचे सख्याज्ञान पक्के होणे.

3. विद्यार्थ्यांचे व्यवहारज्ञान व सांख्यकी क्रिया( बेरीज , वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे, गुणाकार, भागाकार इ. ) प्रात्यक्षिकातून सराव होणे.

४. विद्यार्थी भाषण , संभाषण, संवाद, स्वतःचे म्हणणे स्पष्टपणे मांडणे इ. भाषिक कौशल्यांचा विकास होणे.

५. खरेदी विक्री व्यवहारासह समाजात आसपास घडणाऱ्या गोष्टी, बारगेनिंग कला विकसित करणे.


*कार्यवाही :* 

      १.आपल्या शाळा स्तरावर शनिवारी किंवा अर्ध्या दिवसाच्या शाळेच्या दिवशी सदर उपक्रमाचे आयोजन करावे.

२. पूर्वनियोजन झाल्यावरच उपक्रमाची अंमलबजावणी करावी.

3. उपक्रमापूर्वी 3 ते ४ दिवस शाळा व परिसर, पालक, ग्रामस्थ, शा व्य. समिती सदस्य व गाव वाडीवस्ती येथे समाज माध्यम व सोशल माध्यमातून जाहिरात करावी. (शाळेच्या दृष्टीने गरजेचे)

४. उपक्रमा दिवशी सर्व स्टॉल चे प्रातिनिधीक स्वरुपात एक एक फोटो घ्यावे. १-१ मिनिटांचे छोटे व्हिडीओ घ्यावे.

५. एक शंभर पाणी वही पालक , ग्रामस्थ यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी गेटवर ठेवावी. किंवा एक विद्यार्थी नेमावा.

६. उपक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थी व पालकांची एकत्रित चर्चा सभा घडवावी. फोटो घ्यावे.)

७. बाजाराची उलाढाल हिशोब ठेवावा.

८. प्रसिद्धि माध्यामात बातम्या देण्याचा प्रयत्न करावा.


*नोंद कशी ठेवावी:*

१. एक १० ₹ किंमतीची फोल्डर फाईल करावी.

२. सदर फाईलवर

दशसुत्री अंतर्गत योग्य १० पैकी ज्या सुत्रामध्ये आपण हा उपक्रम बसवणार आहोत त्या चे नाव लिहावे.


वरील माहिती उपक्रमाचे नाव , उदिष्टये लिहावी. गरजेप्रमाणे)

*3. नोंदीचा क्रम ः*

   १. सर्व किंवा प्रातिनिधीक स्वरूपात स्टॉलच्या काढलेल्या फोटोची प्रत (साधारण) १० ते ११. फोटो.

२. अभिप्राय वहीतील निवडक अभिप्रायांची झेरॉक्स

3. उपक्रम यशस्वीते बदल शिक्षक विद्यार्थी प्रतिक्रिया.

४. अभिप्राय नोंदवही फाईलला जोडणे.


           *संकल्पना*

        *श्री. शरद गवळी*

*जि. प. प्रा. शाळा हरिनगर बेंबळे*

 *केंद्र: परिते ता. माढा*

Thursday, July 01, 2021

सेतू अभ्यासक्रम- ब्रीज कोर्स

                             सेतू अभ्यासक्रम- ब्रीज कोर्स 

 शासन निर्णयानुसार 45 दिवस चालणार्‍या ब्रीज कोर्स अभ्यासक्रमाच्या पीडीएफ (PDF) एकत्र उपलब्ध . 



   इयत्ता 2 री ते 10 वी.     खालील लिंकवरून डाऊनलोड करा. 

     ( डाऊनलोड या नावावर क्लिक करा . )

                           

                                                 डाऊनलोड 

                                      

Wednesday, May 20, 2020

ZOOM APP द्वारे स्वत: मीटिंग कशी घ्यावी .

ZOOM APP द्वारे स्वत: मीटिंग कशी घ्यावी .


⇒⇒व्हिडिओ पहाण्यासाठी येथे क्लिक करा ⇒

animated-click-here-sign-and-button-image-0052

Thursday, May 14, 2020

zoom app द्वारे मीटींग कशी जॉइन करावी .

       zoom app द्वारे मीटींग कशी जॉइन करावी     

व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील click बटन दाबा ⇰